ह्या आठवड्याच्या शेवटी पाटलांच्या नवीन फ्लॅटचं उद्घाटन झालं. दारावर तोरण, वाजंत्री, नवं तुळशी वृंदावन आणि सगळ्यांच्या डोळ्यातली एक भावना, घर झालं बुवा आपलं.
तुमच्याही मनात हे असंच काहीसं असेल ना?कधी तरी आपलंही असं घर असावं…पण त्यासाठी होम लोन घ्यावं लागेल. तर मग आज बँक ऑफ बडोदा होम लोन विषयी सर्व माहिती घेऊया आणि घराच्या स्वप्नाला प्रत्यक्षात सुरुवात करूया.
होम लोन म्हणजे नेमकं काय?

म्हणजे बघा घर घ्यायचं आहे, मनात डिझाईनही तयार आहे… पण खिशातली शिल्लक काही परवानगी देत नाही.
तर मग अशा वेळी आपली साथ देते बँक ऑफ बडोदा bank of baroda home loan तुम्हाला घर घ्यायला लागणारी रक्कम देते, आणि तुम्ही ती हळूहळू EMI ने फेडता. सरळ, सोपं, आणि पारदर्शक होम लोन बँक ऑफ बडोदा देते.
कोण घेऊ शकतं बँक ऑफ बडोदा होम लोन?bank of baroda home loan marathi
तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, खाजगी कंपनीत काम करत असाल, स्वतःचा छोटासा व्यवसाय असेल, किंवा अगदी NRI असाल होम लोन मिळू शकतं, फक्त काही गोष्टी जुळायला हव्यात.
वय. किमान 21 आणि जास्तीत जास्त 70 वर्षांपर्यंत (लोन संपेपर्यंत)
नियमित उत्पन्न (पगार/व्यवसाय)
CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर अजून उत्तम
बँक ऑफ बडोदा होम लोन साठी लागणारी कागदपत्रं
तुमचं काम काहीही असो, कागदपत्रं जमवावी लागतातच. पण साधारणतः:
ओळख व पत्ता पुरावा हवा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बील, टेलिफोन बिल, रेशन कार्ड लागेल.
उत्पन्नाचे पुरावे म्हणून नोकरीवाल्यांसाठी: पगाराची स्लिप, IT रिटर्न, बँक स्टेटमेंट लागेल.
व्यवसायिकांसाठी बिझनेस प्रूफ, CA सर्टिफिकेट, 3 वर्षांचे IT रिटर्न अशी कागदपत्र लागतील.
मालमत्तेचे कागद, रजिस्ट्रेशन पेपर, बांधकाम परवानगी,प्लॅन पासिंग परवानगी आणि एखादी बुकिंग रिसीट लागेल.NA ऑर्डर गावखेड्यातील घर असेल तर लागेल.
बँक ऑफ बडोदा किती होम लोन देईल आणि व्याज किती लागेल?
सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न किती लोन मिळेल?बँक ऑफ बडोदा होम लोन इंटरेस्ट रेट किती आहे? तर बँक म्हणते तुमच्या कमाईवर अवलंबून आहे. ₹5 कोटीपर्यंत लोन मिळू शकतं
कालावधी: 30 वर्षांपर्यंत
व्याजदर: 8.40% पासून सुरू, आणि हा दर RBI रेपो रेटवर ठरतो
Loan-to-Value रेशो: साधारणतः घराच्या किमतीच्या 75-90% पर्यंत
काही वेळा Zero Processing Fee ची स्कीमही असते.
महिलांसाठी व्याजदरात विशेष सवलत असते.
अर्ज करण्याची प्रक्रिया अजिबात गुंतागुंतीची नाही!
तुमचं स्वप्न ‘प्लॅन’ मध्ये अडकू नये म्हणून बँकेनं प्रोसेस एकदम सोपी ठेवलीय. bank of baroda home loan marathi
- ऑनलाईन अर्ज करा (https://www.bankofbaroda.in)
- आवश्यक माहिती भरा. उत्पन्न, वय, मालमत्ता इ.
- कागदपत्रं अपलोड करा
- बँकेकडून प्रतिनिधी संपर्क साधेल
- घराची तांत्रिक व कायदेशीर तपासणी
- लोन मंजुरी आणि रक्कम थेट तुमच्या खात्यात येईल.
घर घ्यायचं असेल, तर हे लक्षात ठेवा:
CIBIL स्कोअर सुधारून ठेवा. कर्ज स्वीकृती आणि व्याज दोन्हीवर फरक पडतो
EMI तुमच्या उत्पन्नाच्या 40-50% पेक्षा जास्त नको
Co-applicant (पती-पत्नी) असेल, तर पात्रता वाढते
Tax Benefits IT मध्ये 80C आणि 24(b) अंतर्गत बचत मिळते!
होम लोन साठी बँक ऑफ बडोदा का निवडायची?
घर घेणं हा भावनिक निर्णय आहे,bank of baroda home loan marathi आणि अशा निर्णयासाठी बँकही विश्वासार्ह असावी लागते. ही सरकारी बँक आहे. म्हणजे आधार, पारदर्शक प्रक्रिया असते. व्याजदर कमी, आणि बँकेचा अनुभव मोठा आहे. ऑनलाईन अर्ज, सहज ट्रॅकिंग, आणि तज्ञांचं मार्गदर्शन मिळेल.
घराचं स्वप्न पूर्ण करायचं? तर पहिलं पाऊल बँक ऑफ बडोदा होम लोन घेऊन उचला. bank of baroda home loan marathi
आज आपण जिथं राहतो तिथं घर असतं, पण जिथं स्वतःची ओळख असते, आठवणी बनतात, मुलं मोठी होतात… ते घर स्वतःचं असायला हवं!
बँक ऑफ बडोदा होम लोन हे स्वप्न तुमच्यासाठी सहज साकार करतं. म्हणूनच गरज आहे फक्त विश्वासाने एक पाऊल पुढं टाकण्याची. स्वतःचं हक्काचं घर घ्या पण नीट माहिती घेऊन बरं का!