भारतात सध्या कोणते पर्सनल लोन ॲप्स बेस्ट आहेत? Which are Best personal loan apps 2025.

10 बेस्ट पर्सनल लोन ॲप्स. सर्वात फास्ट लोन, कमी इंटरेस्ट रेट, कमी कागदपत्र लागणारे ॲप्स.

आजच्या काळात अचानक पैशांची गरज कधीही निर्माण होऊ शकते. मग ती वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असो, शिक्षणासाठी लागणारा खर्च असो, घरात काही दुरुस्त्या करायच्या असोत किंवा लग्न-सोहळ्यासाठी पैशांची तजवीज हे सगळं वेळेवर न झाल्यास अडचणीत येऊ शकतो.

अशा वेळी पर्सनल लोन म्हणजे एक योग्य पर्याय ठरतो. पण प्रश्न असा पडतो की कोणते लोन ॲप योग्य आहे? कुठे व्याज कमी लागेल? कुठे कागदपत्रे कमी लागतात? कुठे पैसे लवकर मिळतात?

ह्या लेखात आपण भारतातील अशा टॉप १० पर्सनल लोन ॲप्सविषयी सविस्तर, पण अगदी सोप्या भाषेत माहिती पाहणार आहोत जे तुम्हाला गरजेनुसार कर्ज मिळवण्यात मदत करू शकतील.

पर्सनल लोन ॲप म्हणजे नेमकं काय? what is Best personal loan apps 2025

बेस्ट पर्सनल लोन ॲप अगदी सहज मोबाईल मध्ये वापरून लोन मिळतं. तुम्ही काही साधी माहिती भरून, ओळखीची कागदपत्रं अपलोड करून लोनसाठी अर्ज करू शकता. कधी कधी तर १५ ते ३० मिनिटांत मंजुरी मिळते, आणि एक दिवसात पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. ही प्रक्रिया बँकेपेक्षा कितीतरी झपाट्याने आणि सोप्या पद्धतीने होते.

भारतात सध्या कोणते पर्सनल लोन ॲप्स बेस्ट आहेत? Which are Best personal loan apps 2025.

सध्या भारतात अनेक फायनान्स कंपन्या आणि NBFC संस्थांनी लोन ॲप्स सुरू केले आहेत. काही खास ॲप्स जे लोकांमध्ये विश्वासार्ह आहेत आणि ज्यांना Google Play किंवा Apple Store वर चांगले रेटिंग्स मिळाले आहेत, त्यात पुढील ॲप्सचा समावेश होतो.

Lendingplate
हे ॲप १२% पासून ३६% पर्यंतच्या व्याजदरावर ₹१०,००० ते ₹२.५ लाखापर्यंत कर्ज देते. यामध्ये अर्ज केल्यावर २४ तासांत पैसे खात्यात येतात.

MoneyTap
हे देखील लोकप्रिय ॲप आहे, जे ₹३,००० पासून ₹५ लाखापर्यंत कर्ज देते. हे ॲप खूप सोपं आणि युझर-फ्रेंडली आहे.

Moneyview
ह्यामध्ये फक्त ₹५,००० पासून ₹१० लाखापर्यंत लोन मिळू शकतं. काही मिनिटांत पात्रता तपासली जाते आणि काही तासांत मंजुरीही होते.

Aditya Birla Capital, Tata Capital, आणि Bajaj Finserv ही मोठी कंपन्यांची ॲप्स आहेत. त्यामध्ये ₹१ लाख ते ₹५० लाखापर्यंत मोठ्या रकमेचं कर्ज कमी व्याजदरात मिळतं. पण कधीकधी यासाठी थोडी अधिक पात्रता लागते, जसं की जास्त क्रेडिट स्कोअर किंवा ठराविक उत्पन्न असायला हवं.

KreditBee
हे ॲप अगदी तातडीनं कमी रक्कम हवी असेल तर उपयोगी ठरतं. हे १५ मिनिटांत मंजुरी देऊ शकतं आणि ₹१,००० पासून ₹५ लाखापर्यंत कर्ज देतं.

PaySense, IIFL Finance, आणि IDFC FIRST Bank ही ॲप्सही विश्वासार्ह आहेत आणि EMI प्लॅनिंगच्या दृष्टीने चांगले पर्याय देतात.

Best personal loan apps ॲप्स वापरायचे काय फायदे आहेत?

जलद प्रक्रिया
बँकेत अर्ज केल्यावर ३-७ दिवस वाट बघावी लागते. पण हे ॲप्स काही तासांत किंवा एकाच दिवशी कर्ज मंजूर करतात.

कमी कागदपत्रं
फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट आणि एक फोटो एवढंच पुरेसं असतं.

घरबसल्या सगळं
कुठेही जाण्याची गरज नाही. मोबाईलवरच सगळं अर्ज, तपासणी, मंजुरी आणि पैसे ट्रान्सफर हे सर्व काही एका ॲपमधून.

EMI कॅल्क्युलेटर
किती व्याज लागेल, किती हप्ता असेल हे सगळं ॲपमध्ये आधीच दाखवलं जातं.

डेटा सुरक्षा
बँकसारखीच सिक्युरिटी वापरली जाते. OTP लॉगिन, डेटा एन्क्रिप्शन, गोपनीयता धोरण.

पारंपरिक बँका आणि ॲप्स यामध्ये काय फरक?Difference between best personal loan apps and banks

बँकांमध्ये लोन मिळवायला वेळ लागतो, कागदपत्रं अधिक लागतात, आणि तुमचं वय, उत्पन्न, नोकरी किती वर्षांची आहे, हे सगळं तपासलं जातं. ॲप्समध्ये ही प्रक्रिया कमी वेळात, कमी अटींमध्ये होते. बँका कमी व्याजदर देतात पण त्यासाठी तुमचं क्रेडिट स्कोअर जास्त चांगलं असावं लागतं. लोन ॲप्स थोडं जास्त व्याज घेतात, पण त्या मोबदल्यात तुमची सोय आणि स्पीड देतात.

कोणतं ॲप निवडावं? Which is best personal loan apps in india?

मित्रांनो, जर तुम्हाला लवकर लोन हवं असेल म्हणजे आज अर्ज करा आणि उद्या पैसे हवे असतील तर Moneyview, KreditBee, किंवा Lendingplate हे ॲप्स तुमच्यासाठी बेस्ट ठरतील.

जर तुम्हाला मोठ्या रकमेचं लोन हवं असेल जसं की ₹१० लाख किंवा ₹२० लाख तर Tata Capital, IDFC FIRST Bank किंवा Bajaj Finserv हे चांगले पर्याय आहेत.

जर तुमचं EMI बजेट कमी असेल आणि तुम्हाला लवचिक हप्ते हवे असतील, तर PaySense किंवा MoneyTap विचारात घ्या.

जर सुरक्षितता आणि ब्रँड वैल्यू महत्त्वाची असेल, तर Aditya Birla Capital किंवा IIFL Finance हे खूपच विश्वासार्ह पर्याय आहेत.

FAQ
प्र:पर्सनल लोन साठी CIBIL किती लागतो?
उ: बहुतांश ॲप्स 650 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देतात.

प्र :फ्री-लान्सर किंवा गृहिणीला लोन मिळेल का?
उ: जर उत्पन्नाचा पुरावा देता आला (जसं की बँक स्टेटमेंट), तर काही ॲप्स देतात.

प्र:एकाच वेळी दोन ॲप्सवर लोन घेता येईल का?
उ:हो, पण कर्जफेड कितपत करता येईल हे पाहून दुसऱ्या ॲपवर लोन घ्यायचं की नाही याचा निर्णय घेता येईल.

पर्सनल लोन ॲप वरून लोन घेताना सावधगिरी काय बाळगायची?best personal loan apps

मित्रांनो, Zero Interest म्हणणाऱ्या ॲप्सची खरी अटी नीट वाचा. अनेकदा त्यामागे प्रोसेसिंग फी लपलेली असते.

लोन वेळेवर न भरल्यास CIBIL स्कोअर खराब होतो, त्यामुळे पुढे कुठेही लोन मिळवणं अवघड जातं.

कोणत्याही ॲपकडून PAN, Aadhaar आणि OTP एकत्र मागितला तर सावध व्हा. तो फसवा असण्याची शक्यता जास्त.

म्हणूनच लोन घ्यायचा निर्णय काही लगेच गडबडीत घेऊ नका. आत्ता गरज आहे का? परतफेड शक्य आहे का? हे एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा. कोणतंही ॲप वापरण्यापूर्वी त्यांचा RBI परवाना, ग्राहक रेटिंग, अटी शर्ती नीट वाचा.

आणि हो अतिशय आकर्षक ऑफर्स, कमी वेळात मोठं लोन देण्याचे खोटे वायदे करणाऱ्या ॲप्सपासून लांब रहा.

Leave a Comment